एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे, उजेडात होईल!

तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे. उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणारे एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी घोषणा करतानाच एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल, असा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत

पाटील यांनी लगावला

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हणाले, एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला. त्यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना खडसे यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्कात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे, असेही जयंत पाटील यांनी यांनी सांगितले.

भाजपचे 10 ते 12 आमदार राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत

खडसेंसोबत कोण आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, ‘खासगीत बऱ्याच जणांनी खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा व्यक्त केली आहे. जे खडसेंचे नेतृत्व मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही असे लोक राष्ट्रवादीत दाखल होतील. त्याचप्रमाणे करोनाकाळात विधानसभेची निवडणूक घेणं परवडणार नाही त्यामुळे 10 ते 12 आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार यथाककाश राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

खडसे यांना कोणते मंत्रीपद मिळणार; चर्चेला उधाण

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंत एकनाथ खडसे यांना थेट मंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. यासाठी राष्ट्रवादीतील एक कॅबिनेट मंत्री खडसेंसाठी राजीनामा देणारी असून जो मंत्री राजीनामा देईलो तो प्रदेशाध्यक्ष होईल असेही आडाखे बांधले जात आहेत. यामध्ये दिलीप कळसे-पाटील किंवा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आक्हाड यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत खडसे यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

खूश रहे तू सदा ये दुवा है मेरी

एकनाथ खडसे यांचे पक्ष सोडणे कार्यकर्ता म्हणून धक्कादायक असून या घोडामोडींवर चिंतन करण्याची गरज आहे. त्यांनी या बाबत पुनर्विचार करावा. भाजप कुण्या एकाचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजप विस्तारात खडसेंचे मोठे योगदान आहे. खडसेंनी राष्ट्रवाद जोपासणारा पक्ष ते राष्ट्रवादाचा बुरखा घालणाऱया पक्षात जाणे हा प्रवास वेदनादायी असल्याचीही टीका त्यांनी केली. सत्ता नसताना त्यांनी कार्यकर्ता बांधून ठेवला आता त्यांचा धीर खचला याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे मतही व्यक्त करतानाच ओ जानेवाले हो सके तो लौट के आना, अशी काव्यात्मक साद सुधीर मुनगंटीकार यांनी घातली. त्यांनी पुनर्विचार करावा आणि गेलेच आहेत तर त्यांनी सुखी राहावे असे सांगताना मुनगंटीवार यांनी ‘खुश रहे तू सदा ये दुवा है मेरी’ या फिल्मी गीताची आठवण करून दिली.

खडसेंचा पक्षांतराचा निर्णय दुर्दैवी

एकनाथ खडसे यांचा पक्षांतराचा निर्णय दुर्दैवी आहे. तो पक्षापेक्षा त्यांच्यासाठी अधिक दुर्दैवी असून नाथाभाऊंनी भाजप सोडायला नको होता. खडसेंची समजूत काढण्यात पक्ष कुठेही कमी पडलेला नाही. दिल्या घरी सुखी राहा, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

ठरलेल्या गोष्टी आपण टाळू शकत नाही

खडसे कितीही रागावले तरी हा निर्णय घेणार नाही, याबाबत आम्ही सगळेच आशावादी होतो. ठरलेल्या गोष्टी आपण टाळू शकत नाही, त्यामुळे एकनाथ खडसेंनी राजीनामा देणं हे कटू सत्य असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्यापर्यंत पोहोचला. त्यांचा राजीनामा हातात पडेपर्यंत मी आणि आम्ही सगळेच आशावादी होतो की, कितीही रागावले तरी खडसे हा निर्णय घेणार नाहीत. ते आमच्याशी बोलतील आणि यातून मार्ग काढून आम्ही पुढे जाऊ. खडसेंनी पक्षात रहावं, त्यांनी आमचं नेतृत्त्क करावं हिच आमची इच्छा होती. त्यामुळे सातत्याने त्यासदंर्भात प्रयत्न झाले. पण सगळेच प्रयत्न यशस्की होतात असं नाही, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या