एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये घरपावसी करणार असल्याचे सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीनंतर खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होती. अर्थात भाजपकडून अद्याप अधिकृतपणे अशी काही घोषणा झालेली नाही. मात्र माझा भाजप प्रवेश झाला होता, पण घोषणा झाली नाही, असा गौप्यस्फोट खडसे यांनी करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
माझ्या काही अडचणी होत्या. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याची इच्छा होती. जयंत पाटील यांनाही सर्व गोष्टी सांगितले होत्या. जेपी नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश झाला. मात्र खालच्या लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार असून भाजपकडून प्रतिसादाची आणखी वाट पाहीन आणि त्यानंतर राष्ट्रवादीत सक्रिय होईल, असा निर्वाणीचा इशारा खडसे यांनी दिला.
दरम्यान, गेल्या आठड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी जळगावला आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सर्व आमदारांना कार्यक्रमाचे निमंत्रण देणे बंधनकारक होते. तरीही मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. वेळेत निमंत्रण असते तर मी या कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र, आता निमंत्रण मिळालं तरी मी कार्यक्रमाला जाणार नाही, असे खडसे त्यावेळी म्हणाले होते.
फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका, एकनाथ खडसेंचा घरचा आहेर