विनोद तावडे, राम शिंदेंनंतर एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांच्या भेटीला

2918

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावरून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त निमंत्राची एक पोस्ट केली होती. यात त्यांनी समर्थकांना ‘मावळे’ शब्दाने हाक देत पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? असा मजकूर प्रसारित केला होता. पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर त्या भाजप सोडणार अशी जोरदार राजकीय वर्तुळात सुरू झाली. अखेर मंगळवारी त्यांनी समाजमाध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले, परंतु माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या वक्तव्यानंतर हे प्रकरण पुन्हा वर आले आहे. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

अखेर पंकजा मुंडे बोलल्या, फेसबुक पोस्टनंतर पहिली प्रतिक्रिया

परळी या भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातून पराभव झाल्याने आणि पक्षानेच आपला गेम केला असा समज झाल्याने काहीशा नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टनंतर ट्विटर हॅण्डलवरून भाजपची ओळख हटवली. यामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून त्यांच्या मनधरणीसाठी राज्यातील नेत्यांनी धावाधाव सुरू केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, राम शिंदे या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन पंकजा मुंडे पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. मंगळवारी पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले.

पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

प्रकाश शेंडगेंचा गौप्यस्फोट
सर्व काही सुरळीत असताना धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांनी ओबीसी असल्यानेच पंकजा यांचे खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप केला. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपने केला होता. मात्र, त्याला विरोध केल्यानं तो ठराव फेटाळण्यात आला. तोच प्रकाश पंकजा मुंडे यांच्यासोबत केला जात आहे, असा गौप्यस्फोट केला. यानंतर बुधवारी विनोद तावडे एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या