आम्ही सत्तेबाहेर, नारायण राणेंसारखे ‘त्यागी’ मात्र सत्तेत!

24

सामना ऑनलाईन । धुळे

आणीबाणीच्या काळात देशात लोकशाही यावी म्हणून अनेकांनी संघर्ष केला. त्यांच्यामुळे आज केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. पण पक्षवाढीसाठी आयुष्य वेचणारे कार्यकर्ते आज सत्तेबाहेर असून नारायण राणेंसारख्या ‘त्यागी’ माणसांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला.

धुळे येथे मदनलाल मिश्रा यांच्या ‘आणीबाणी – चिंतन आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी खडसे यांनी भाजपावर निशाणा साधला. खडसे म्हणाले की, भाजपाची सत्ता यावी म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला, कशाचीही पर्वा केली नाही तेच आज सत्तेपासून लांब आहेत; पण नुकताच पक्ष स्थापन केलेल्या राणे यांना सत्तेत घेण्याचे काम सुरू आहे. हे असेच सुरू राहिले तर जुन्या कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळणार, असा सवालही खडसे यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या