मनापासून लोक आले असते तर सभा अर्धवट सोडून गेले नसते, एकनाथ खडसे यांची शिंदे गटावर टीका

eknath-khadse

मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्री व चार मंत्र्यांच्या सभेला जर खरंच मनापासून लोक आले असते तर सभा अर्धवट सोडून उठून गेले नसते. अशी टीका आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावच्या दौऱयावर आले होते तेव्हा मुक्ताईनगर येथे सभा घेतली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठsचा विषय असताना मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच लोक सभेतून उठून जायला लागले होते. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांनी भाषण आवरतं घेत उठून चाललेल्या लोकांना थांबण्याची विनंती केली, मात्र बऱयाच खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. यावर बोलतांना एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्र्यांची सभा केवळ नाथाभाऊ किरुद्ध गरळ ओकण्यासाठीच होती असेही खडसे म्हणाले.