केंद्राच्या कृपेची वेदांताने केली होती मागणी, मुख्यमंत्र्यांचे वेदांताच्या अगरवाल यांना लिहिलेले पत्र जगासमोर आले

वेदांता फॉक्सकॉनने (Vedanta Foxconn) पुण्याजवळील तळेगाव येथे सेमींकंडक्टर प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले होते. मात्र हा प्रकल्प त्यांनी अचानक गुजरातला होत असल्याचे घोषित केले होते. यामुळे सत्ताधारी एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांची मोठी अडचण झाली आहे. यातच वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेले एक पत्र उजेडात आले आहे. अगरवाल यांनी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारसोबत समन्वय साधण्यात यावा आणि राज्य मंत्रिमंडळाची प्रकल्पाला मंजुरी मिळावी अशा दोन मागण्या राज्य सरकारला केल्या होत्या. त्यांच्या या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 26 जुलै रोजी अगरवाल यांना एक पत्र लिहिलं होतं.

26 जुलैला अगरवाल यांना लिहिलेल्या पत्रात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते की वेदांता समूहाने केलेल्या दोन्ही मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. याविषयी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करुन त्या आधारे राज्य मंत्रिमंडळाची मंजुरीही घेतली जाईल, असं आश्वासन शिंदेंनी या पत्रातून दिलं होतं. जनसत्ता या हिंदी दैनिकाच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की वेदांताना केलेल्या विनंतीवर राज्य सरकार सकारात्मकतेने विचार करत आहे. शिंदे यांनी अगरवाल यांना आश्वासन दिलं होतं की एका उच्चस्तरीय समितीचे गठन केले जाईल आणि मोबदल्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. या पत्रामध्ये शिंदे यांनी मोबदल्यासाठी केंद्र सरकारसोबत उत्तम ताळमेळ असावा अशीही मागणी करत असून त्यामुळे प्रकल्पाला चांगले समर्थन मिळू शकेल असेही लिहिले होते. या पत्राबाबत वेदांता समूहाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला गेला आहे.