विमानतळ परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सकारात्मक निर्णय घेणार- एकनाथ शिंदे

eknath-shinde

विमानतळ परिसरातील फनेल झोनमधील इमारतींची उंची वाढवता येत नसल्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत समस्या भेडसावत आहेत. याविषयी माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पुढाकाराने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन नगरविकासमंत्र्यांनी दिले.

फनेल झोनमधील इमारतींत राहणाऱया रहिवाशांच्या पुनर्विकासाबाबत माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेल्या पत्रानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली. याबात परिवहनमंत्री अनिल परब यांनीही सूचना केली होती. त्यानुसार या बैठकीत इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी उंचीची मर्यादा आह़े त्याचबरोबर ध्वनी प्रदुषणामुळे अतिरिक्त सदनिका उपलब्ध करणेही अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी येणाऱया बांधकाम खर्चाची तरतूद होईल त्यानुसार धोरण निश्चित करून निर्णय घेणे गरजेचे आहे असे प्रि.विश्वनाथ महाडेश्वर व नगरसेकक बाळा नर यांनी निदर्शनास आणले. त्याच बरोबर शासनाने निर्णय घेण्यास वेळेची मर्यादा ठेवणे गरजेचे आहे असे स्थानिक रहिवाशांनी मत व्यक्त केल़े

रहिवाशांना न्याय देणारे धोरण ठरवणार
सदर फनेल झोन मधील रहिवाशांच्या अडचणी दुर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक शिष्टमंडळानी विनंती केल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले. सदर विषयाबाबत तातडीने सखोल अभ्यास करून या रहिवाशांना न्याय देण्याच्या दृष्टीने धोरण निश्चित करण्यात यावे असे निर्देश नगरविकास विभागाचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांना नगरविकास मंत्र्यांनी दिले. या शिष्टमंडळात आमदार दिलीप लांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत पवार, शाखाप्रमुख सुनिल मोरे, म्हाडाचे अधिकारी, वास्तुविषारद तुषार श्रोत्री, विश्वजित भिडे, राकेश वाघेला, श्रीकृष्ण शेवडे यांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या