देवी-देवता आणि सैनिकांचा अपमान, एकता कपूर विरोधात मध्य प्रदेशातही FIR दाखल

1082

अल्ट बालाजीवरील एका वेबसिरीजमुळे निर्माती एकता कपूरच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. XXX नावाच्या वेबसिरीजमध्ये राष्ट्रीय प्रतीकाचा,  सैनिकांचा आणि देवी-देवतांचा अपमान करण्यात आला आहे असे तक्रारदाराने म्हटले आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हिंदुस्थानी भाऊने देखील एकता कपूरच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. एकता कपूरने आल्ट बालाजीच्या एका वेबसीरीजमध्ये हिंदुस्थानी जवानांचा अपमान केला आहे, असं हिंदुस्थानी भाऊने तक्रार दाखल केल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं. खार पोलीस स्थानकात त्याने ही तक्रार नोंदवली होती.


View this post on Instagram

A post shared by Hindustani Bhau (@hindustanibhau) on

निर्माती एकता कपूर यांची आल्ट बालाजी हा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर अडल्ट कंटेटचा भरणा आहे. त्यात XXX season 2 मध्ये एका एपिसोडमध्ये एक महिला जवानाची पत्नी दाखवली आहे. ही पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स करते. सेक्स करताना तिने हिंदुस्थानी सैन्याचा पोषाख घातला आहे, यामुळे हिंदुस्थानी सैन्याचा अपमान झाला, म्हणून निर्माती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी माफी मागावी अशी मागणी हिंदुस्थानी भाऊने केली आहे.

हिंदुस्थानी भाऊने इन्स्टाग्रामवर लाईव्ह या प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या