राज्यातलं भारनियमन वाढण्याची शक्यता

25

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील कोराडीसह अनेक ठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्पातील २ संच तांत्रिक कारणामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत असून, राज्यात भारनियमन वाढण्याची चिन्हं आहेत. राज्यात विजेच्या एकूण मागणीच्या तुलनेत वीजपुरवठा कमी आहेत. त्यात भरीला भर म्हणून महानिर्मितीचे कोराडी आणि चंद्रपूरमधील प्रत्येकी एक अशा १ हजार १६० मेगावॅटचे दोन संच तांत्रिक कारणाने बंद पडले आहेत.

कोराडीत वीजनिर्मिती ६६० मेगावॅटचा युनिट क्रमांक १० चा बेल्ट अलायमेंट तुटलं आहे. तर चंद्रपूरात काही संचात कोळशातून ज्वाळा तयार होणाऱ्या प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळं हे संच बंद पडल्याचे महानिर्मितीकडून सांगितलं जातं आहे. दरम्यान, विजेचा पुरवठा कमी पडू नये, म्हणून महानिर्मितीने कोयनातील जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती वाढवली आहे. पण पाण्याअभावी हे संच लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही संच त्वरित सुरू झाले नाहीत तर राज्याला मोठ्या प्रमाणावर भारनियमन सहन करावं लागण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या