मीरा भाईंदरमध्ये एका केअर टेकरने 78 वर्षांच्या वयोवृद्धाला जबर मारहाण केली, या मारहाणी नतंर वृध्दाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलगा दिपक शिंदे यांनी मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.
तक्रारदार दिपक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत भीकाजी शिंदे वय 78 वर्षे हे सेंट्रल रेल्वेमध्ये अधिकारी म्हणून काम करीत होते. त्यांना 4-5 महिने आधी पॅरिलेसचा अटॅक आला होता म्हणून त्यांची देखभाल करण्यासाठी बाबुल नामे इसमाला कामावर ठेवण्यात आलं होतं. पण 24/9/2024 रोजी बाबुल याने रात्री दारू पिऊन वडील चंद्रकांत शिंदे यांना लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी मी मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल केली होती. मात्र, आज पहाटे 5 च्या सुमारास चंद्रकांत शिंदे यांचे निधन झाले.
याबत आरोपी बाबुल रघुनाथ नाहक याला तमिळनाडू येथून मिरा रोड पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. तसेच त्याल अटक करून आज रोजी मा.न्यायालय समक्ष हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. पुढील तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक रामेश्वर पडवळ हे करीत आहे. सदरची कामगिरी डीसीपी प्रकाश गायकवा, एसीपी मराठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विजेंद्र अंबावडे, सपोनी रामेश्वर पडवळ पोलीस हवालदार गिरमे, पोलीस हवालदार अमोल बामणे, कुमेश राठोड यांनी पार पाडली आहे