मोटरसायकल अपघातानंतर जखमी झालेल्या वृद्ध महिलेला रुग्णालयात न नेता तिला भिवंडी येथे रस्त्यात टाकून रिक्षाचालकाने पळ काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या मोटरसायकलस्वार आणि रिक्षाचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
लक्ष्मी सयानी या बोरिवलीच्या शिंपोली येथे राहत होती. 30 मे रोजी सकाळी त्या घरातून बाहेर पडल्या. रात्री त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला. एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. दहिसर येथे उड्डाणपुलावर अपघात झाला असून मोटरसायकलस्वाराने वृद्ध महिलेला धडक दिली अशी माहिती मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. तेथे जाऊन पोलिसांनी चौकशी केली.
महिलेला एका रिक्षाचालकाने रुग्णालयात नेले अशी माहिती समजताच पोलिसांचे पथक तेथील रुग्णालयात गेले. तेव्हा अपघातातील जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले नसल्याचे उघड झाले. भिवंडी-कामण येथे रस्त्यावर महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लक्ष्मीच्या नातवाला भिवंडी येथील आरोग्य पेंद्रात नेले. तेव्हा लक्ष्मीची ओळख पटली. रिक्षाचालकाने वृद्ध महिलेला रुग्णालयात न नेता भिवंडी येथील रस्त्यावर फेकून पळ काढला.
अपघातात जखमी झाल्याने लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला होता. मोटरसायकलच्या धडकेत लक्ष्मी या जखमी झाल्या. अपघातानंतर रिक्षाचालकाने महिलेला रुग्णालयात दाखल न करता भिवंडी येथील रस्त्यावर टाकून पळ काढला. पोलिसांनी मोटरसायकलस्वार आणि रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.