गुजरात निवडणूक संपेपर्यंत जीएसटी दरकपातीची जाहिरातबाजी नको

38

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुजरात विधानसभेची निवडणूक होईपर्यंत ग्राहकप्रिय खाद्यवस्तूंवरील ‘जीएसटी’च्या दरात केल्या जाणाऱया कपातीची जाहिरातबाजी करू नका, अशी तंबी केंद्र सरकारला निवडणूक आयोगाने दिली आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडणार असून दुसऱया टप्प्यातील मतदान १४ डिसेंबर रोजी तर त्या निवडणुकीचा निकाल १८ डिसेंबर रोजी लागणार आहे.

ग्राहकप्रिय खाद्यवस्तूंवरील जीएसटीच्या दरातील कपातीची जाहिरातबाजी केल्यास त्याचा मतदारांवर प्रभाव पडू शकतो असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जीएसटी दरातील कपातीची जाहिरात गुजरातमधील मतदानाचा दुसरा टप्पा १४ डिसेंबरला पार पडल्यानंतर करता येईल, असेही निवडणूक आयोगाने केंद्राला सांगितले आहे. कोणत्याही उत्पादनाचा वा वस्तूचा उल्लेख न करता करपद्धतीच्या सुलभीकरणाची जाहिरात करण्यास मुभा आहे असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या