लसीकरण प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो हटवा! निवडणूक आयोगाची केंद्र सरकारला आचारसंहितेची ‘लस’

पश्चिम बंगालसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करू नका, अशी स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला केली आहे आणि केंद्र सरकारला आचारसंहितेची ‘लस’ टोचली आहे.

पश्चिम बंगालसह तामीळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुच्चेरी या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो म्हणजे आचारसंहितेचा भंग असून भाजप त्याचा प्रचार करीत आहे, अशी तक्रार तृणमूल काँग्रेसने केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपावरील मोदींचा फोटो असलेले होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते.

नोटांवर गांधीजींच्या जागी मोदी स्वतःचा फोटो छापतील

पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, विमानतळावर मोदींचे फोटो आहेत. लसीकरण प्रमाणपत्रावर मोदी आहेत. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस नोटांवरून गांधीजींचा फोटो हटवून मोदी स्वतःचा फोटो छापतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या