
ग्रामपंचायत कट्टा येथे सरपंच यांचे अध्यक्षते ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली. या ग्रामसभेत तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात आली, या मध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्षस्थानी संस्था व्यवस्थापक दयानंद लवू शेडगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच श्वेता कोयडे तसेच उपसरपंच नाना करंगुटकर, सदस्य मनाली मयेकर,शारदा शेडगे, स्वरा करंगुटकर,तेजस्विनी शेडगे, नाना कोयंडे, जगन्नाथ कोयंडे तसेच डॉक्टर आकाश राऊत, आरोग्य सेविका शिला पेठे, सुभाष किर, आशा सेविका चित्रा किर ,संतोष करंगुटकर, ग्रामसेविका अजंना वळंजु, सिध्दी शेडगे, महेश कोयंडे ,राजु करंगुटकर संतोष शेडगे,विजय करंगुटक, विनोद शेडगे, विश्वास शेटये,निलम मयेकर, हेमांगी तारकर. कादंळन प्रकल्प सदस्य पूजा कविटकर ईत्यादी मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एक माहितगार,अभ्यासु कला प्रेमी अध्यक्ष लाभल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. आपले मत व्यक्त करताणा अध्यक्ष म्हणाले शांततेकडुन समृध्दीकडे सर्वानासोबत घेऊन गावातील तंटे गाव पातळीवर सामंजस्याने मिठविन्यावर भर देणार व गावात शांतता व एकता अबाधित ठेवणार असल्याचे शेडगे यांनी सांगितले.