अभियंते इलेक्शन ड्युटीला, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट लटकणार

34

सामना ऑनलाईन । मुंबई

स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाईने ‘गुड कंडिशन’मध्ये असल्याचा अहवाल देऊनही ‘हिमालय’ पूल दुर्घटना घडल्यामुळे मुंबईभरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करून दुरुस्ती होण्याची गरज आहे. मात्र पालिकेच्या पूल विभागातील 56 पैकी 54 अभियंते इलेक्शन ड्युटीला गेल्यामुळे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट लटकणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक होईपर्यंत मुंबईकरांवर दुर्घटनेची टांगती तलवार राहणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पादचारी पूल 14 मार्च रोजी कोसळून सहा जणांना नाहक जीव गमवावा लागला. यानंतर पालिका प्रशासनाने एका महिन्यात सर्व पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा सुमारे 60 टक्के स्टाफ इलेक्शन ड्युटीवर गेल्यामुळे दैनंदिन कामावर मोठा परिणाम झाला आहे, मात्र स्ट्रक्चरल ऑडिटचे काम वेगाने होण्याची गरज असताना पूल विभागातील टेक्निकल स्टाफ इलेक्शन ड्युटीवर गेल्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशी आहे स्थिती

  • मुंबई शहरात 39, पूर्व उपनगरात 66 आणि पश्चिम उपनगरातील 157 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट नव्याने करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
  • मुंबईत सध्या तब्बल 18 पूल अतिधोकादायक आहेत. यामध्ये 4 खासगी तर 14 पालिकेच्या मालकीचे आहेत. पालिकेच्या अखत्यारीतील 14 पुलांपैकी 7 पूल पाडण्यात आले आहेत, तर उर्करित 7 पूल लककरच पाडण्यात येणार आहेत.

हे अधिकारी निकडणुकीच्या कामाला
मुख्य अभियंता-1, कार्यकारी अभियंता – 6, सहाय्यक अभियंता-9, दुय्यम अभियंता – 38, ज्युनियर अभियंता – 1

आतापर्यंतचे काम
पश्चिम उपनगर : 157 पूल, 64 पुलांचे ऑडिट पूर्ण
पूर्व उपनगर : 66 पूल, 14 पुलांचे ऑडिट पूर्ण
शहरातील 39 पुलांपैकी अद्याप 193 पूल ऑडिटच्या प्रतीक्षेत

आपली प्रतिक्रिया द्या