रत्नागिरी-सिंधुदुर्गात एक वाजे पर्यंत 39.93 टक्के मतदान

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून १९४२ मतदान केंद्रावर मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या चार तासात १४ लाख ५४ हजार ५२४ मतदारांपैकी ५ लाख ८० हजार ७९१ मतदारांनी हक्क बजावला. एक वाजे पर्यंत ३९.९३ टक्के मतदान झाले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात १४ लाख ५४ हजार ५२४ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ७ लाख ४२ हजार ४७८ महिला आणि ७ लाख १२ हजार ३४ पुरुष मतदार आहेत.१२ इतर मतदार आहेत. त्यापैकी पहिल्या दोन तासात १ लाख ४९ हजार ३४९ मतदारांनी आपला हक्क बजावला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे डॉ. निलेश राणे, काँग्रेस आघाडीच्या वतीने नविनचंद्र बांदिवडेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती जोशी, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीतर्फे राजेश दिलीप जाधव, बहुजन समाज पार्टीतर्फे किशोर वरक, समाजवादी फ़ॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय गांगनाईक, अपक्ष विनायक लवू राहत, पंढरीनाथ आंबेरकर, बहुजन मुक्ता पार्टीचे भीकूराम पालकर, अपक्ष नारायण गवस,नीलेश भातडे रिंगणात आहेत.