राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कुमार शेट्ये यांची निवड

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सुहास उर्फ़ कुमार शेट्ये यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कुमार शेट्ये यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कुमार शेट्ये हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पक्ष स्थापनेपासून त्यांनी विविध पदावर काम केले आहे. त्यांनी रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती पदही भूषविले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कुमार शेट्ये यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी प्रदेश पदाधिकारी बशीर मुर्तुझा, जिल्हा बॅंकेचे संचालक रत्नागिरी विधानसभा क्षेत्राध्यक्ष रामचंद्र गराटे, रत्नागिरी युवक शहराध्यक्ष मंदार नैकर, प्रसाद वैद्य,सुजाता तांबे उपस्थित होते.