महापौर, उपमहापौर निवडणुकीला 3 महिने मुदतवाढ

183

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  राज्यातील ज्या महानगरपालिकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे अशा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, उल्हासनगरसह राज्यातील 13 महानगरपालिकांच्या महापौर-उपमहापौरपदासाठीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मार्च 2017 मध्ये महापौर व उपमहापौर निवडले गेले होते त्यांची मुदत या महिनाअखेर संपत आहे. मात्र राज्यात ऑक्टोबर-2019 मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक प्रस्तावित आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणुका पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या