विरोधकांनी २०१९ची लोकसभा निवडणूक विसरावी!: अब्दुल्ला

25
omar-abdullah

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाच राज्यांच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर जम्मू आणि कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत विरोधकांना २०१९ ची लोकसभा निवडणूक विसरून जाण्याचा सल्ला दिला आहे. सर्व विरोधकांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही अब्दुल्ला यांनी दिला आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, या निकालानंतर आपल्या सगळ्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक विसरून २०२४ च्या निवडणूकीची तयारी सुरू करायला हवी. २०१९ मध्ये मोदींच्या समोर टिकाव धरेल असा एकही नेता सध्या दिसत नसल्याचं म्हणत अब्दुल्लांनी मोदींची प्रशंसा केली आहे. तसंच भाजपचा विजयरथ रोखला जाणार नाही असे नाही योग्य उमेद्वार मिळाला आणि मतदारांनी त्याला ओळखल्यास भाजपचा विजयरथ नक्कीच रोखला जाईल अशा विश्वासही ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.

tweets

आपली प्रतिक्रिया द्या