राज्यसभेतील ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान

48

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राज्यसभेतील ५८ जागांच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. या सर्व जागांसाठी २३ मार्चला मतदान होईल. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल-मे महिन्यांत संपणार आहे.

कसा आहे निवडणूक कार्यक्रम ?

देशातील १६ राज्यातील ५८ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १२ मार्च असेल. तर २३ मार्चला सकाळी ९ ते ४ या दरम्यान मतदान होईल. त्याच दिवाशी संध्याकाळी पाच वाजता मतमजोणीला सुरूवात होईल.

महाराष्ट्रातून कोण होणार निवृत्त ?

महाराष्ट्रातून राज्यसभेत निवडून गेलेल्या ६ खासदारांची मुदत संपणार आहे. शिवसेनेचे अनिल देसाई, काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि रजनी पाटील, राष्ट्रवादीचे डी.पी. त्रिपाठी आणि वंदना चव्हाण तर भाजपचे अनिल संचेती हे सहा खासदार निवृत्त होणार आहेत.

या दिग्गजांची मुदत संपणार

केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जे.पी. नड्डा, प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांचाही कार्यकाळ संपणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि अभिनेत्री रेखा हे खासदार देखील निवृत्त होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या