Ampere Electric ने हिंदुस्थानात लॉन्च केली इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जमध्ये गाठणार 121 किमीचा पल्ला…

दुचाकी निर्माता कंपनी Ampere Electric ने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ampere Magnus EX लॉन्च केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. हिंदुस्थानात या स्कूटरची टक्कर Ola S1 शी होणार आहे. आज आपण याच स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Magnus EX स्कूटरमध्ये कंपनीने हलकी आणि पोर्टेबल लिथियम बॅटरी देण्यात आली आहे. यातील बॅटरी सेटअप घर, कार्यालय, कॉफी शॉप किंवा कोणत्याही प्लग-ऑन-वॉल चार्ज पॉईंटवरील कोणत्याही 5-amp सॉकेटवरून सहज चार्ज केली जाऊ शकते. या स्कूटरमध्ये 1200 वॅटची मोटर देण्यात आली आहे. ही स्कूटर 10 सेकंदात 0 ते 40 किमी प्रति तास वेग प्राप्त करते. यात दोन राईडिंग मोड देण्यात आले आहे. ज्यात सुपर सेव्हर इको मोड आणि पेपर पॉवर मोडचा समावेश आहे. एकदा संपूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर 121 किमी पर्यंत न थांबता धावू शकते.

फीचर्स

Magnus EX मध्ये एलईडी हेडलाइट, 450 मिमी लेगरूम स्पेस, कीलेस एंट्री आणि अँटीहेफ्ट अलार्म सारखे फीचर्स देण्यात आले आहे. कंफर्ट ड्रायव्हिंगसाठी यात रेगुलर स्कूटरपेक्षा मोठी सीट देण्यात आली आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मेटॅलिक रेड, ग्रेफाइट ब्लॅक आणि गॅलेक्टिक ग्रे या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपल्बध आहे.

किंमत

कंपनीने या स्कॉउटरची किंमत 68,999 रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.