पैठण तालुक्यात बिल भरल्यावरही महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

30

सामना प्रतिनिधी । पैठण

पैठण तालुक्यात महावितरण विभाग मनमानी करत आहे. विद्युत बिले भरलेली असताना सरसकट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. थकीत बिलांसाठी मुदतवाढही दिली जात नाही. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार संदिपान भुमरे यांनी आज मुंबई मंत्रालयात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी मंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला कडक आदेश देऊन थकबाकी मुदतवाढ व वीजपुरवठा खंडित न करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, सोमवार, २६ रोजी याबाबत जिल्हा प्रशासनाने बैठक घेण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांची मुंबई येथे बुधवार, २१ रोजी भेट घेऊन पैठण विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांच्या लाईन बाबतीत महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी लाईन कट करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी आमदार संदिपान भुमरे यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावेळी संभाजीनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे हजर होते. त्या तक्रारींच्या अंनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी आज सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी गणेशकर (मुख्य अंभियंता विद्युत वितरण कंपनी, संभाजीनगर) यांना फोनवरून ज्या शेतकऱ्यांनी याअगोदर विद्युत मोटारीचे बिल भरलेले आहे. त्यांचे कनेक्शन कट करण्यात येऊ नये, असे सक्त आदेश दिले आहेत. तसेच थकबाकीदारांना वीजबिल भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या बाबतीत सोमवार रोजी संभाजीनगर येथे महत्त्वाची बैठक घेण्यात यावी, असे आदेशही या वेळी देण्यात आले आहेत.

शेतकरी अडचणीत आल्यानंतर आमदार संदिपान भुमरे व जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे हे तत्काळ धावून येतात. वीज महावितरण अधिकाNयांना कडक आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार भुमरे यांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या