एल्गार प्रकरणात एनआयएच्या गुन्ह्यात 11 आरोपीविरुद्ध देशद्रोहाचे कलम गायब

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एल्गार परिषद प्रकरणी 11 जणांविरोधात नव्याने गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी नऊजण तुरुंगात आहेत. यासर्वांविरोधात यापूर्वी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीविरुद्ध भादंवि कलमाच्या 124 ए (देशद्रोह) गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.  एनआयएच्या एफआयआरमध्ये देशद्रोहाच्या कलमाचा उल्लेखही करण्यात आलेला नसल्याचे दिसत आहे. मात्र, देशद्रोहाचे कलम लावणे न लावणे पुढील तपासाचा भाग असल्याचे बचाव पक्षाचे वकील ऍड .शाहिद अख्तर आणि अ‍ॅड. राहुल देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या