एलॉन मस्क यांनी बदलले नाव; ट्विटरवर Mr Tweet हीच बनली ओळख…

जगातील श्रीमंताच्या यादीत समावेश होत असलेले टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यात ते अनेक बदल करत आहेत. तसेच ते स्वतः ट्विटरवर अॅक्टिव असून ते नेहमी प्रोफाईल बदलत असतात. आता त्यांनी प्रोफाईलवर पुन्हा एकदा नाव बदलले असून ते आता Mr Tweet हे नाव ठेवले आहे. एकदा एका सुनावणीवेळी एका वकिलाने त्यांना या नावाने संबोधले होते.

वादविवादात झालेल्या सुनावणीत वकिलाने दिलेले हे नाव त्यांना आवडल्याने आता त्यांनी हेच नाव ठेवले आहे. मात्र, त्यांची नवे नाव घेतल्याने त्यांचीच अडचण झाली आहे. आता या नंतर ते प्रोफाईलमधील नाव बदलू शकत नाही. यानंतर नाव बदलण्यासाठी कंपनी त्यांना परवानगी देत नसल्याने त्यांची अडचण होत असून आता Mr Tweet हेच नाव त्यांची ओळख बनले आहे.

याबाबतची माहिती मस्क यांनी सोशल मिडीयाद्वारेच दिली आहे. आपण या नव्या नावातच अडकल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता कंपनी आपल्याला पुन्हा नाव बदलण्याची परवानगी देत नसल्याचे त्यांनी सांगितले. ट्विटर खरेदी केल्यापासून मस्क ट्विटरवर अॅक्टिव असतात. अनेक गोष्टींबाबत ते मते व्यक्त करत सूचना करत असतात.मात्र, आता ते स्वतःच Mr Tweet या नावात अडकले आहेत.