मस्क आणणार नवीन टीव्ही ऍप, नेटफ्लिक्स, यूटय़ूबचे टेन्शन वाढणार

टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क हे लवकरच नवीन टीव्ही ऍप आणणार आहेत. मस्क यांचे हे ऍप नेटफ्लिक्स आणि अन्य ओटीटी ऍप्ससारखे असणार आहे. त्यामुळे यूटय़ूबसह नेटफ्लिक्सचे धाबे दणाणले आहेत. एक्स युजर्स या टीव्ही ऍपला एक्स प्लॅटफॉर्मवरून ऍक्सेस करू शकतील. एलन मस्क यांनी कन्फर्म केले की, अँड्रॉयड टीव्हीसाठी एक्स टीव्ही ऍपचे बीटा व्हर्जन जारी केले आहे. बीटा व्हर्जन एलजी, ऍमेझॉन फायर टीव्ही, गुगल टीव्ही डिव्हाइससाठी लाइव्ह केले आहे. परंतु एक्स टीव्ही ऍपच्या लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. एक्स टीव्ही ऍप हे एक नवीन ओटीटी स्ट्रिमिंग आहे. हे इंटरनेट सब्सक्राइबरसाठी उपलब्ध असेल.