मानवी मेंदूत बसवणार चिप, मस्कच्या कंपनीला अमेरिकेची मान्यता

मानवी मेंदूलाही आता एखाद्या यंत्राप्रमाणे कंट्रोल करता येणार असून त्यात एक चिप बसवता येणार आहे. एलन मस्कची कंपनी न्यूरालिंक हे करणार असून नुकतीच यासाठी त्यांना अमेरिकेच्या फुड्स अँड ड्रग्स डिपार्टमेंटकडून (ळएइअ) मंजुरी मिळाली आहे. चीप बसवण्यासाठी अशा लोकांचीच क्लिनिकल चाचणीसाठी निवड केली जाईल, जे स्वतः या कामासाठी सहमत असतील. म्हणजेच, यासाठी कंपनीकडून एक फॉर्म जारी केला जाईल. जो इच्छुक लोक भरून या चाचणीचा भाग बनू शकतात.

ही एक मायक्रो चिप असेल. म्हणजे एक छोटी एआय चिप अगदी सिम कार्डपेक्षाही छोटी. या चिपच्या मदतीने अनेक आजार वेळेवर ओळखून ते बरेही होऊ शकतात. ही न्यूरालिंक चिप कॉम्प्युटरशी जोडली जाणार असून ती व्यक्ती न बोलताही कॉम्प्युटर आणि मोबाईलवर काम करू शकणार आहे. म्हणजे चिप तुमचे मन वाचेल आणि सर्व क्रिया न बोलता होत राहतील. ज्यांना अर्धांगवायू, अंधत्व, स्मरणशकती कमी होणे आणि न्यूरो संबंधित आजार आहेत त्यांच्यासाठी न्यूरालिंक चिप फायदेशीर आहे. मानवी चाचणी लवकरच होईल आणि या चिपचं भविष्य स्पष्ट होईल.