१५ वर्षांपासूनचा फरार आरोपी, सापडला कपड्यांच्या ढिगाखाली

13

सामना ऑनलाईन । मुंबई

१५ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार असलेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मनोज तिवारी (५१) असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर २००२ साली फसवणुकीच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांना गुंगारा देत तो १५ वर्षं फरार होता.

रविवारी मनोज आपल्या घरी आल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांनी जुहू येथील मनोजच्या घरी धाड टाकली. तेव्हा मनोजची पत्नी वंदना हिने तो घरात नसल्याची बतावणी केली. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिने तो घरातच लपून बसल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा मनोज घरातल्या वॉशिंग मशीनच्या मागे लपल्याचं त्यांना आढळलं. कोणालाही दिसू नये म्हणून तो धुवायला काढलेल्या कपड्यांच्या ढिगाखाली लपला होता.

फसवणुकीच्या आरोप असूनही मनोज एकदाही न्यायालयात हजर झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरुद्ध वॉरंट जारी कें होतं. तसंच आता पोलिसांची दिशाभूल केल्याची आणखी एक तक्रार मनोजच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे. याखेरीज मनोजची पत्नी वंदना हिलाही पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आणि आरोपीला लपण्यास मदत करणे या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या