EMI सवलतीच्या नावाखाली बँकांची लूटमार, कर्जदाराला अतिरिक्त व्याज द्यावे लागणार

4770

रिझर्व्ह बँकेने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 27 मार्चला निर्देश जारी केले होते. सर्व बँक ग्राहकांना EMI चे हप्ते भरण्यासाठी 3 महिन्यांची सवलत द्यावी. मार्च, एप्रिल आणि मेचे हप्ते कापले जाऊ नयेत आणि ही रक्कम नंतर घेण्यात यावी. बुधवारी बहुतांश बँकांनी याबाबत आपापल्या निर्णयांची घोषणा केली, मात्र अनेक बँकांनी EMI कापला आहे. लोकांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनेक बँकांनी EMI बाबत दिशानिर्देश जारी केले आहेत. ज्यांना सवलत हवी आहे त्या ग्राहकांना काय करावे लागेल आणि तीन महिन्यांचे हप्ते न भरल्यास किती अतिरिक्त व्याज द्यावे लागेल, याची माहिती निर्देशांत दिली आहे. एसबीआयने उदाहरण देत सांगितले की, संबंधित ग्राहकाकडे 30 लाख गृह कर्ज आहे आणि ते फेडण्याचा अवधी 15 वर्षे शिल्लक आहेत, ते तीन महिन्यांची सूट घेत असतील तर 2.34 लाख रुपये अतिरिक्त व्याज द्यावे लागेल. ही रक्कम 8 हप्त्यांसमान आहे. अशा पद्धतीने एखाद्या ग्राहकाने 6 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे आणि ते फेडण्यासाठी 54 महिन्यांचा अवधी शिल्लक असेल तर सवलत अवधीचा पर्याय निवडल्यास त्याला 19 हजार रुपये अतिरिक्त व्याज द्यावे लागेल. ही रक्कम दीड टक्के अतिरिक्त EMI समान आहे.

कर्जदारांना व्यक्त केली नाराजी
बँकांच्या या निर्णयावर कर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. हप्त्याची मुदत आणखी पुढे वाढवण्यात यावी पण अतिरिक्त व्याज लावू नये अशी मागणी होत आहे. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेल्याने आणि अनेक लोक घर किंवा संबंधित मालमत्ता भाड्याने देऊन त्यातून आलेल्या पैशातून हप्ते भरते. मात्र लॉकडाऊन काळात हप्ते मागावे कसे आणि अतिरिक्त व्याजाची रक्कम कशी जमवाववी या विवंचनेत कर्जदार अडकले आहेत.

कर्ज इतिहासावर परिणाम नाही
सवलत अवधी घेण्यासाठी बँकेला माहिती द्यावी लागेल
एसबीआयनुसार, 1 मार्च 2020 ते 31 मे 2020 दरम्यान मुदत कर्जाचे हप्ते स्थगित करण्यासाठी पाऊल उचलले आहे आणि रिपेमेंटचा अवधी तीन महिन्यांनी वाढवला आहे. या अवधीसाठी चालू भांडवल सुविधेवर व्याजही 30 जूनपर्यंत द्यावे लागणार नाही. स्थगिती अवधीत 3 हप्ते न भरल्यास ग्राहकाच्या कर्ज इतिहासावर परिणाम होणार नाही. तुम्हाला आपल्या कर्जाच्या हिशेबाने फॉर्म भरून एसबीआयला मेल करावा लागेल.

कर्ज अवधी 3 महिने वाढेल, पण…
कर्जाचा अवधी तीन महिन्यांनी वाढेल. तीन महिन्यांदरम्यान लागणारे व्याज पुढे वसूल होईल. पुढेही हप्त्यासोबत व्याज समायोजित केले जाईल. 1 मार्चआधी कोणता ओव्हरड्यू असेल तर भरावा लागेल. जुना हप्ता टाळला जाणार नाही. हप्ता न भरल्यास दंड लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या