कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱयांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाखांची मदत

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या व ग्रामपंचायतीमध्ये विविध पदांवर काम करणारे सतरा अधिकारी व कर्मचाऱयांचा कोरोनाने मृत्यु झाला. या कर्मचाऱयांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोरोना संकटकाळात ग्रामीण पातळीवरील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सीएससी कंपनीचे केंद्र चालक, कामगार व जिल्हा परिषद कर्मचाऱयांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी कोरोना संक्रमण काळात ग्रामीण भागातील संक्रमण रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत होते. लोकांमध्ये जावून जनजागृती करत होते. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाची अंमलबजावणी करण्यामध्ये या कर्मचाऱयांनी महत्वाचे योगदान दिले आहे. काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. अशा कर्मचाऱयांच्या वारसांना मदत देण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या