शिक्षण व्यवस्थेतील गुन्ह्यांवर भाष्य करणार ”चीट इंडिया”

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमध्ये किसिंग बॉय अशी प्रतिमा असलेला अभिनेता इमरान हाश्मी लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चीट इंडिया’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील गुन्ह्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट असणार आहे.

या चित्रपटात इमरान मुख्य भूमिकेसह सहनिर्मातेपदही सांभाळणार आहे. ‘चीट इंडिया’ हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवार महिन्यात प्रदर्शित होणार असून इमरानने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून केली आहे. इमरानने कॅप्शन देताना असे म्हटले की, ”गेल्या काही दिवसातच मी वाचलेल्या पटकथांपैकी ‘चीट इंडिया’ ची पटकथा खूपच दमदार आहे. या चित्रपटातील माझी भूमिका माझ्या करिअरमधील सर्वात्कृष्ठ भूमिका असेल अशी माझी खात्री आहे”.

‘चीट इंडिया’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शक सौमिक सेन असणार आहेत. या चित्रपटाबाबत बोलताना इमरानने सांगितले की, ‘चीट इंडिया’ ची पटकथा आणि शीर्षक खूपच सशक्त आहे. मी या चित्रपटात भूमिका साकरण्यासाठी फारच उत्साही आहे. दिग्दर्शक सौमिक सेन, त्याशिवाय सहनिर्माते भूषण कुमार, तनुज गर्ग व अतुल कासबेकर यांच्यासोबत काम करण्यासही मी फार उत्सुक आहे.