स्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा

131

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडला 44 वर्षानंतर वर्ल्डकप जिंकून देण्यामध्ये अष्टपैलू स्टोकची कामगिरी महत्त्वाची राहिली होती. अंतिम लढतील स्टोक्सने धावांचा पाठलाग करताना नाबाद 84 आणि सुपर ओव्हरमध्येही नाबाद 8 धावांची खेळी केली. वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत इंग्लंडसाठी ‘हिरो’ ठरलेल्या बेन स्टोक्सचे वडील त्याच्या दमदार कामगिरीवर खूश आहे. परंतु इंग्लंडच्या विजयावर मात्र नाराज आहेत.

आयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले

बेन स्टोक्सचा जन्म 4 जून, 1991 रोजी न्यूझीलंडची राजधानी क्राईस्टचर्च येथे झाला होता. 12 वर्षाचा असताना तो इंग्लंडला आला आणि येथेच क्रिकेटचे बाळकडू शिकला. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्टोक्सने इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. आज इंग्लंडमध्ये स्टोक्सच्या नावाचा उदो उदो सुरू असला तरी त्याचे आई-बाबा आजही न्यूझीलंडमध्ये राहतात.

CWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले

इंग्लंडच्या विजयानंतर स्टोक्सचे वडील गेरार्ड स्टोक्स यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी स्टोक्सच्या अंतिम लढतीतील कामगिरीवर समाधान व्यक्त केले, परंतु आजही आमच्या भावना न्यूझीलंडशी जोडल्या गेलेल्या आहेत हे देखील नमूद केले. न्यूझीलंडने विश्वचषक उंचवावा अशी आमची इच्छा होती, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या