कलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क

1363

जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर कश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहिली चकमक घडली आहे. बारामुल्लामध्ये दहशतवादी लपलेल्या भागाला सुरक्षा दलाने घेराव घातला असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. कलम 370 हटवल्यानंतर 16 दिवस कश्मीरमध्ये शांतता होती. मात्र, 16 दिवसांनी दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली आहे. सुरक्षा दल त्यांना चोख प्रत्युत्तर देत असून या भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने 5 ऑगस्टला जम्मू कश्मीरमधील कलम 370 रद्द केले होते. त्यानंतर कश्मीर खोऱ्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे दहशतवादी भेदरले होते. त्यामुळे 16 दिवसात दहशतवाद्यांनी हालचाल केली नव्हती. त्यामुळे कश्मीर खोऱ्यात शांतता होती. मात्र, मंगळवारी दहशतवाद्यांनी कुरघोडींना सुरुवात केली आहे. लष्कराचे जवान त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या