जम्मू-कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

18

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे हिंदुस्थानचे लष्कर व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चमकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. दरम्यान, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच अजून काही दहशतवादी या भागात लपल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम अजूनही सुरू आहे.

त्राल येथील जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाचे जवान व 42 राष्ट्रीय रायफल्सचे जवान यांनी संयुक्तपणे या जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला असता त्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

सहा महिन्यात 117 दहशतवादयांचा खात्मा

जम्मू-कश्मीरमधील शोपिया जिल्हयात रविवारी सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. गेल्या 6 महिन्यात दहशतवाद विरोधी पथकाने निरनिराळ्या अभियानात कश्मीरमध्ये 117 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात 89 दहशतवादी स्थानिक होते.

आपली प्रतिक्रिया द्या