होल्डरचा इंग्लंडला शॉक, पाहा एका मिनिटात 6 विकेट्स

6927

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज (Eng Vs Wi) यांच्यात पहिला कसोटी सामना साऊथॅम्प्टन येथे खेळवला जात आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने एकाच डावात 6 बळी घेतले आणि इंग्लंडला परतण्याची संधी दिली नाही.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना साऊथॅम्प्टन येथे खेळला जात आहे. दुसर्‍या दिवसावर संपूर्ण पकड वेस्ट इंडीजची असल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 204 धावांवर गडगडला. विंडीजचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने 6 बळी घेतले आणि इंग्लंडला परतण्याची संधी दिली नाही. त्याच्याशिवाय शॅनन गॅब्रिएलने 4 बळी घेतले. जेसन होल्डरने चांगली कामगिरी केली.

सोशल मीडियावरही त्याचे कौतुक होत आहे. ट्विटरवर जेसन होल्डर ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर त्या एक मिनिटाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचे 6 बळी पाहायला मिळत आहेत.

जेसन होल्डरने क्रोली, बेन स्टोक्स, पोप, बटलर, जोफ्रा आर्चर आणि वुड यासारखे फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. होल्डरने 42 धावा देऊन 6 बळी घेतले. इंग्लंडच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना शॅनन गॅब्रिएल आणि जेसन होल्डरच्या चेंडूंचा सामना करता आला नाही. गॅब्रिएलने 62 धावा देऊन चार गडी बाद केले आणि होल्डरने 42 धावा देऊन 6 बळी घेतले, जे हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या