शत्रू संपत्तीचा लिलाव

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरात पसरलेल्या शत्रू संपत्तीचे सर्व्हे पूर्ण झाले असून लवकरच त्यांचा लिलाव होणार आहे. या एक लाख करोड रुपयांच्या तब्बल ९४०० शत्रू संपत्तीची बोली लावली जाईल.

१९६८ मध्ये पारित करण्यात आलेल्या शत्रू संपत्ती संरक्षण कायद्यात अलीकडेच संशोधन झाले आहे. त्यानंतर सरकारने अशा संपत्तीच्या लिलावाची पावले उचलली आहेत. अलीकडे एका बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ६२८९ शत्रू संपत्तीचे सर्व्हे पूर्ण झाल्याचे सांगितले. उर्वरित २९९१ संपत्तींचे सर्व्हे करण्यात येईल, अशीही माहिती दिली. ज्या मालमत्तांमध्ये कुणी राहत नाही, त्यांचा लिलाव लवकरच करण्यात येईल. असे आदेश गृहमंत्रालयाकडून मिळाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. देशभरातील सर्व शत्रू संपत्तीची निर्धारित रक्कम एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यातून सरकारला मोठी रक्कम मिळेल. याच पद्धतीने पाकिस्तानात हिंदुस्थानींची मालमत्ताही विकण्यात आली आहे. राज्य सरकारकडूनही अशा मालमत्तांची ओळख पटवून त्यांची किंमत ठरवण्यासाठी नोडल अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक शत्रू संपत्ती

पाकिस्तानात जाणाऱ्या लोकांची तब्बल ९२८० मालमत्ता आहे. त्यापैकी सर्वात जास्त मालमत्ता उत्तरप्रदेशात आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये २७३५ तर दिल्लीत ४८७ मालमत्ता आहेत. यामध्ये १२६ मालमत्ता चीनचे नागरिकत्त्व घेतलेल्या लोकांची आहे. त्यातही ५७ शत्रू संपत्ती मेघालयात तर २९ पश्चिम बंगालमध्ये आहे. आसामध्ये अशी ७ मालमत्ता आहे.

शत्रू संपत्ती म्हणजे काय…

शत्रू संपत्ती म्हणजे अशी संपत्ती जिचे मालक पाकिस्तान, चीन आणि अन्य देशांत निघून गेले आहेत. त्यांची विक्री सरकार करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या