CWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले

127

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रविवारी झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवून पहिल्यांदाच वर्ल्डकपवर मोहोर उमटवली. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील रोमहर्षक झालेला अंतिम सामना वादात सापडला आहे. आयसीसीच्या नियमांवर दिग्गजांनी बोट उचलले आहे. क्रिकेट खेळाडूंपासून बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील आयसीसीला सुनावले आहे. अभिनेते परेश रावल, विवेक ओबेरॉय, लेखक चेतन भगत, शर्ली सेतिया या सेलिब्रिटींनी आयसीसीवर निशाणा साधला आहे.

दोनवेळा टाय झालेला सामना चौकारांचा निकष लावून सोडवण्यात आल्याने क्रीडाप्रेमी निराश झाले आहेत. न्यूझीलंडला याचा तोटा झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली आहे. बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी आयसीसीच्या नियमांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्रसिंह धोनीचे ग्लोव्हज बदलण्याऐवजी आयसीसीने आपले मूर्खासारखा सुपर ओव्हरमधील नियम बदलायला हवा, असे ट्वीट परेश रावल यांनी केले आहे. तसेच चेतन भगत यांनी देखील आयसीसीच्या नियमांवर टीका केली आहे.

ग्लोव्हजचे प्रकरण काय आहे?
वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थान व दक्षिण आफ्रिकेतील सामन्यात धोनीने आफ्रिकेच्या फेलुक्वायोच्या यष्ट्या उडवल्या. त्याच वेळी धोनीचे ग्लोव्हज कॅमेरात टिपण्यात आले. त्या ग्लोव्हजवर लष्कराचे बलिदानाचे चिन्ह होते. त्याच्या त्या ग्लोव्हजचे फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी धोनीच्या या कृतीचे कौतुक केले होते. परंतु आयसीसीने नियमांचा हवाला देत हे चिन्ह हटवण्यास सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या