पाच हजारांची लाच घेताना अभियंता जेरबंद

तक्रारदार यांच्या चुलतीचा पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासाठी कंत्राटी भोकरदन पंचायत समितीचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रदीप रंगनाथ राठोड यांना 20 हजार रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता 5 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज 28 फेब्रुवारी रोजी भोकरदनच्या पंचायत समिती आवारात करण्यात आली.

यातील तक्रारदार यांच्या चुलतीस पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासाठी यातील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता प्रदीप रंगनाथ राठोड यांनी तक्रारदार यांना 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून 27 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालय, भोकरदनच्च्या आवारात लाच मागणी पडताळणी केली असता कंत्राटी अभियंता प्रदीप रंगनाथ राठोड यांनी तक्रारदार यांच्या चुलतीचा पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासाठी पंचासमक्ष 20 हजार रुपये लाचेची मागर्णा करून तडजोडी अंती 5 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

यावरून आज शुक्रबार, 28 फेब्रुवारी रोजी सापळा कारवाई दरम्यान कंत्राटी कर्मचारी प्रदीप रंगनाथ राठोड यांनी पंचायत समिती कार्यालय भोकरदन च्या पार्किंगमध्ये 5 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली व पंचायत समिती कार्यालय भोकरदनच्या समोर असलेल्या हिंदुस्थान झेरॉक्स व ग्राहक सेवा केंद्राचे चालक अस्लम बेग यांच्याकडे देऊन ते स्वतःचे खात्यावर टाकण्यास सांगितले असता कंत्राटी कर्मचारी प्रदीप रंगनाथ राठोड यांना अॅन्टी करप्शन ब्युरो, जालनाचे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांनी व त्यांचे पथकाने ताब्यात घेतले असून लाचेची रक्क्म ग्राहक सेवा केंद्राचे चालक अस्लम बेग यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचारी यांची अंगझडती घेतली असता रोखख २० रुपये, मोटारसायकलची चावी व 1 मोबाईल मिळून आला.

कंत्राटी कर्मचारी प्रदीप रंगनाथ राठोड, कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती, भोकरदन (जि. जालना) यांच्याविरुध्द पोलीस ठाणे भोकरदन जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, जालनाचे पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व पथकातील अंमलदार श्रीनिवास गुडुर, शिवलिंग खुळे व भालचंद्र बिनोरकर यांनी केली.