पाकिस्तानी क्रिकेट मंडळ (पीसीबी) आपले सर्वस्व पणाला लावून आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी जुंपला आहे. पण अद्याप बीसीसीआयला हिंदुस्थानी सरकारने क्रिकेट संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पीसीबी प्रचंड तणावाखाली वावरत आहे. याप्रकरणी जय शहा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. तेच यातून काही ना काही मार्ग काढतील, अशी आशा इंग्लंड क्रिकेट मंडळाचे (ईसीबी) अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांनी व्यक्त केली आणि त्यांना तो मार्ग काढावाच लागणार असल्याचे मतही बोलून दाखवले. सध्या ईसीबीचे अध्यक्ष आणि सीईओ रिचर्ड गोल्ड पाकिस्तानात आहेत. थॉम्पसन यांनाही चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत उत्सुकता आहे. हिंदुस्थानशिवाय ही स्पर्धा होऊच शकत नाही. मात्र जर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ पाकिस्तानच्या दौऱयावर जाणार नसेल तर अन्य पर्यायांचा विचार करायला हवा, असेही थॉम्पसन म्हणाले.