इंग्लंड बोर्डाकडून क्रिकेटमध्ये वर्णभेद, कृष्णवर्णीय खेळाडूंच्या संख्येत घट

988

अमेरिकेत जॉर्ज फ्लायड या कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना आपले प्राण गमवावे लागले. त्याबद्दल जगभरातून निषेध नोंदवण्यात आला. वर्णद्वेषाचे पडसात क्रिकेटमध्येही उमटताना दिसत आहेत. डॅरेन सॅमी, ख्रिस गेल या वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंनी या विरोधात पाऊल उचलले असतानाच आता कर्णधार जेसन होल्डर यानेही वर्णद्वेष करणाऱया खेळाडूंना डोपिंग किंवा फिक्सिंग करणाऱयांना जी शिक्षा दिली जाते ती शिक्षा दिली जावी अशी मागणी आयसीसीकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने यापुढे कृष्णवर्णीय खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी मोहीम सुरू करणार असल्याचे या बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.

जोप्रा आर्चर बार्बाडोसमधून येथे आला
जोप्रा आर्चर हा कृष्णवर्णीय खेळाडू सध्या इंग्लंडच्या संघात आहे. पण तो इंग्लंडचा स्थानिक खेळाडू नाहीए. तो वेस्ट इंडीजमधील बार्बाडोसमधून येथे आलाय. शिवाय रग्बी या खेळामध्ये पाच ते सहा खेळाडू कृष्णवर्णीय असू शकतात, तर मग क्रिकेटमध्ये का नाही, असा सवालही लोंसडेले स्पीनर याने यावेळी उपस्थित केला आहे.

म्हणून त्यांना डावलले जाते
इंग्लंडच्या चमूत 1990 सालापासून कमीतकमी कृष्णवर्णीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. पुढे जाऊन हे खेळाडू व्यवस्थापनात प्रवेश करू शकतात. या भीतीने इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड अशा खेळाडूंना डावलते, असे स्पष्ट मत सरे या काऊंटी क्लबचा माजी खेळाडू लोंसडेले स्पीनर याने व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या