मंत्र्याने महिला सहकाऱ्याला सेक्स टॉय खरेदी करायला सांगितलं, चौकशी सुरु

83

सामना ऑनलाईन, लंडन

इंग्लंडचा कारभार पाहणाऱ्या सरकारमधील एका मंत्र्याची चौकशी करण्याचे आदेश तिथल्या पंतप्रधान टेरीजा मे यांनी दिले आहेत. मार्क गार्नियर असं या मंत्र्याचं नाव असून त्याने त्याच्या महिला सहकाऱ्याला माझ्यासाठी सेक्स टॉय खरेदी करून आण अशी फर्माईश केली. ते इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी या महिला सहकाऱ्याच्या शरीराच्या विशिष्ट भागाकडे बघून शेरेबाजीही केली. गार्नियर हे तिथले परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री आहे.

एका वृत्तपत्राने याबाबत गार्नियर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते म्हणाले की त्यांनी केलेलं विधान हे  एका टीव्ही शोवरून सुरु असलेल्या मनोरंजक चर्चेचा एक भाग होतं आणि त्यांनी जे विधान केलं ते मस्करीमध्ये केलं होतं. मात्र ही मस्करी गार्नियर यांना महागात पडण्याची चिन्ह आहे कारण त्यांच्यानविरूद्ध चौकशी सुरु करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या