बाहेरून आलेल्या व्यक्तिसोबत सेक्स बेकायदेशीर! ‘या’ देशाचा नवीन कायदा

11090

कोरोनामुळे जगभरात अनेक बदल होत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम किती काळ राहणार याची निश्चिती नाही. त्यामुळे आता अनेक देशांनी आपले कायदे बदलण्यास सुरुवात केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंड या देशाने नागरिकांच्या खासगी स्पेसवर काही प्रमाणात निर्बंध लावले आहेत. इंग्लंडमधील मुक्त वातावरणावर ही बंदी असणार आहे. यापुढे इंग्लंडमध्ये नागरिकांना त्यांच्या घरात पाहुण्यांना बोलवण्यासाठी योग्य कारण द्यावं लागणार आहे. तसंच आपल्याच घरात बाहेरून आलेल्या व्यक्तिशी सेक्स करण्यावर बंदी घातली आहे.

दोन वेगवेगळ्या घरात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी एकांतात भेटण्यावर हे निर्बंध आहेत. शिवाय, त्यात दोन पेक्षा अधिक माणसांच्या भेटीवर बंदी घालण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार, कुणीही दुसऱ्याच्या घरी रात्रीचा मुक्काम करू शकणार नाही. जर कुणाला तसं करायचं असेल तर त्याच्याकडे योग्य कारण असणं गरजेचं आहे. मात्र, या रात्रीच्या मुक्कामाच्या कायद्यावर काही जणांना सूट देण्यात आली आहे. यांमध्ये खेळाडू, अंत्यसंस्कारासाठी जमलेले, कर्मचारी आणि वैद्यकीय मदतीची गरज असलेले रुग्ण अशा सर्वांना या कायद्यातून सूट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या