क्रिकेटपटू साराने ‘सारे’ कपडे उतरवले, इन्स्टाग्रामवर विवस्त्र फोटो केला शेअर

133080

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील यष्टीरक्षक खेळाडू सारा टेलर ही सध्या खेळापेक्षा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या सौदर्यासाठी आणि चपळाईने यष्टीचीत करण्यासाठी ओळखली जाणाऱ्या साराने सारे कपडे उतरवले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला विवस्त्र फोटो शेअर केला आहे.

सारा टेलर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा विवस्त्र फोटो शेअर केला आहे. जनजागृतीसाठी साराने हा फोटो शेअर केला आहे. ‘womens health uk’ या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी सारा टेलरने हे फोटोशूट केले आहे. हा फोटो शेअर करताना अनकन्फर्ट झाल्याचेही ती म्हणाली.

विवस्त्र फोटो शेअर केल्यानंतर सारा म्हणाली की, ‘असे फोटोशूट करणे हे माझ्या कंफर्ट झोनच्या बाहेरचे होते, पण एका चांगल्या कारणासाठी मी हे केले. इतर महिलांप्रमाणेच मलाही स्वतःच्या शरिराबद्दल तक्रार करत राहण्याची सवय होती, मात्र मी त्यातून बाहेर पडले आहे. प्रत्येक मुलगी ही दिसायला सुंदरच असते.’

आपली प्रतिक्रिया द्या