मँचेस्टर सिटीने प्रीमियर लीग किताब जिंकला

मँचेस्टर सिटी क्लबने यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. मंगळवारी लिसेस्टर सिटी क्लबने मँचेस्टर युनायटेड क्लबला हरविताच मँचेस्टर सिटी क्लबने किताबावर शिक्कामोर्तब केले. पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया मँचेस्टर सिटी संघाचे चार सत्रांतील हे तिसरे विजेतेपद होय.

प्रशिक्षक केप गार्डियोला यांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर सिटी क्लबने दुसऱयांदा इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. आता या संघाला 30 मे रोजी चेल्सी क्लबविरुद्ध यूईएफए चॅम्पियन्स लीगची फायनल खेळायची आहे. मँचेस्टर सिटी क्लबने मागील 10 वर्षांत सर्वाधिक पाच वेळा प्रीमियर लीगचा किताब जिंकलेला आहे. चेल्सीने 2 वेळा, तर लिसेस्टर सिटी, लिवरपूल व मँचेस्टर युनायटेड यांनी प्रत्येकी एक वेळा या स्पर्धेचा किताब जिंकलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या