अरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन! इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका

जगभर फैलावलेल्या कोरोना विषाणूचे भाषेशी कनेक्शन असल्याची चकित करणारी माहिती पुढे आली आहे. इंग्रजी न बोलणाऱयांना कोरोनाचा पाच पटीने अधिक धोका असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील संशोधकांनी काढला आहे. तेथील सर्वेक्षणादरम्यान स्पॅनिश आणि कम्बोडियन भाषा बोलणाऱया नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका पाच पट अधिक, तर इंग्रजी बोलणाऱया केवळ 4 टक्के नागरिकांना विषाणूची लागण झाल्याचे आढळले.

युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्पूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी 300 मोबाईल क्लीनिक आणि 3 हॉस्पिटलमधील 31 हजार कोरोना रुग्णांच्या चाचण्यांचा अभ्यास केला. स्पॅनिश आणि कम्बोडियन भाषा बोलणाऱयांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका, तर अरेबिक भाषा बोलणाऱयांना कोरोनाचा कमी धोका असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. सर्वेक्षण केलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 18.6 टक्के लोक हे बिगर इंग्रजी बोलणारे होते, तर इंग्रजी बोलणारे केवळ 4 टक्के अमेरिकन होते. भाषानिहाय आकडेवारीनुसार, कम्बोडियन-26.9 टक्के, स्पॅनिश आणि एम्फेरिक-25.1 टक्के, चिनी-2.6 टक्के, अरेबिक-2.8 टक्के तसेच साऊथ कोरियाची भाषा बोलणाऱया रुग्णांचे प्रमाण 3.7 टक्के आढळले. याव्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या भाषा बोलणाऱया समूहातील 4.7 टक्के कोरोना रुग्ण आढळले.

ब्रिटनमध्ये कृष्णवर्णीय, अल्पसंख्यकांना संसर्ग

ब्रिटनच्या सर्वेक्षणात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण कृष्णवर्णीय, आशियाई व अल्पसंख्यकांमध्ये अधिक असल्याचे आढळले. गोऱयांच्या तुलनेत दुप्पट कृष्णवर्णीयांना कोरोना महामारीत प्राण गमवावा लागला. ‘द टाइम्स’च्या अहवालानुसार 1 हजार लोकांपैकी 23 ब्रिटिश, 27 आशियाई आणि 47 कृष्णवर्णीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या