ठाणे १५ जुलैपर्यंत निर्धास्त, बारवीत पुरेसा पाणीसाठा

125

सामना प्रतिनिधी । ठाणे

कडक उन्हाळ्यात तोंडचे पाणी पळाले असतानाही सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाNया बारवी धरणात १०२ टीएमसी एवढा पाण्याचा साठा असून १५ जुलैपर्यंत कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. ठाणेकरांनो, निर्धास्त रहा. धरणातील पाणी साठ्याचे प्रमाण ४३.८१ टक्के असल्याने जादा शटडाऊन करण्याची गरज पडणार नसल्याचा निर्वाळा एमआयडीसीच्या अधिकाNयांनी दिला आहे.

१९७८ पासून कार्यान्वित झालेल्या या धरणातून कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, मुंब्रा, कळवा, दिवा, ठाणे, मीरा-भार्इंदर व नवी मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने सामील झालेल्या २७ गावांनादेखील बारवी धरणच पाणी पुरवते. निवासी भागाबरोबरच बदलापूर, अंबरनाथ, तळोजा, महापे, ठाणे येथील एमआयडीसी भागातदेखील कारखान्यांना याच बारवी धरणामधून पाणी दिले जाते. बारवी धरणात पुरेसा पाणीपुरवठा असल्याने कारखानदारांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे.

दोन दिवस शटडाऊन

बारवी धरणात गेल्या वर्षी आजच्या दिवशी केवळ १९.९१ टक्के एवढाच पाण्याचा साठा होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शटडाऊनला सामोरे जावे लागले. यंदा मात्र ही परिस्थिती नसल्याने महिन्यातील केवळ दुस-या व चौथ्या शुक्रवारी शटडाऊन करण्यात येत आहे. पाण्याच्या साठ्याची समाधानकारक स्थिती असल्याने हे शटडाऊन आणखी वाढणार नसल्याचा निर्वाळा अधिकाNयांनी दिला आहे.

सहा मीटरने उंची वाढवली

बारवी धरणाची उंची ४९ मीटर एवढी असून भविष्यकाळाची पाण्याची गरज लक्षात घेऊन या धरणाची उंची सहा मीटरने वाढविण्यात आली आहे. बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे काम केवळ बाकी असून ते झाल्यानंतर वाढविलेल्या सहा मीटर उंचीचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ३ टीएमसीने वाढणार असून त्याचा फायदा ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना होणार आहे.

शाई धरणासाठी २५ कोटींची तरतूद

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या तसेच पाण्याची गरज लक्षात घेता महापालिकेचे स्वत:चे धरण असावे अशी इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांची आहे. त्यासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले असून धरणाच्या प्राथमिक कामासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच त्यास मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या