
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करत आपला जलवा दाखवला आहे. या दरम्यान शिल्पाचे सौंदर्य आणि ग्लॅमरस अवतार पाहण्यासारखा आहे.
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीचे नाव बी टाऊनच्या टॉप अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये आहे.
शिल्पा शेट्टीचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये शिल्पा कट आऊट गाऊनमध्ये खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. शिल्पाचे हे फोटो एका फॅशन शो दरम्यानचे आहेत.
या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी रेड कार्पेटवर रॅम्प वॉक करताना दिसत आहे. शिल्पाला तिच्या अभिनयाव्यतिरिक्त फिटनेसबाबतही ओळखले जाते. 47 वर्षाची ही अभिनेत्री सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीतही तरुण अभिनेत्रींना टक्कर देते.
शिल्पा शेट्टी लवकरत रोहित शेट्टीच्या ‘कॉप ड्रामा’ सिनेमात दिसणार आहे. रोहित शेट्टीने काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या सेटवरील शिल्पाचे काही फोटो शेअर केले होते.