Photo – जेनेलियाचा साडीतील कमाल लूक, साडीची किंमत जाणून व्हाल अवाक

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसोजा सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. आपले वेगवेगळे फोटो आणि मजेदार व्हिडीओ टाकून ती चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकतेच एका समारंभातील तिचा साडीच्या लूकमधील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. साडीत ती प्रचंड सुंदर दिसत असून साडीची किंमत जाणून अवाक व्हाल.

जेनेलिया चित्रपटसृष्टीपासून काही काळ दूरच आहे. पण त्याचा असर तिच्या स्टाईल आणि फिटनेसवर अजिबातच झाला नाही. ती कोणत्याही समारंभात पोहोचते त्यावेळी तिची स्टाईल हटके असते. नुकतीच ती एका फॅशन शो मध्ये आली होती. त्यावेळी तिने साडी नेसली होती, त्यात ती स्टनिंग दिसत होती.

जेनेलिया डिसूझाने पावडर ब्लू कलरमध्ये सिक्वेन्स साडी नेसली होती, जी तिने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून घेतली होती.

तिची संपूर्ण साडी सिक्वेंसने भरलेली आहे. साडीच्या बॉर्डवरही सीक्वेंस जोडले आहेत. जोनेलियाने या साडीवर शीयर फॅब्रिक ब्लाउज घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

साडीवर घातलेला ब्लाउज हॉल्टर नेक पद्धतीचा असून ब्लाऊजच्या गळ्याभोवती रफल आहेत. तिचे हे ग्रेसफुल लूक पूर्ण करण्यासाठी तिने अल्ट्रा ग्लॅम हेवी मेकअप केला होता.

साडीवर तिने डार्क ब्लू डायमंड ईयररिंग्ससोबत बांगड्या घातल्या आहेत. तर केसांना स्लीक बनमध्ये स्टाइल केले आहे. जेनेलियाच्या या साडीची किंमत जाणून सर्वसामान्यांना धक्काच बसेल. डिजाइनरच्या अधिकृत संकेतस्थळावर या साडीची किंमत 2 लाख 25हजार रुपये आहे.