माफी मागितली नाही तर बहिष्कार घालू, पत्रकारांचा कंगनाला इशारा

18
kangana-ranaut-slams-sonam


सामना ऑनलाईन । मुंबई

वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौत हिचा आगमी चित्रपट जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात तिने पीटीआईच्या पत्रकारासोबत वाद घातल्यानंतर आता पत्रकारांनी तिच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. जो पर्यंत कंगना रनौत माफी मागत नाही तोपर्यंत तिच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असा इशारा एन्टरटेन्मेट गिल्ड ऑफ इंडिया या पत्रकारांच्या संघटनेने कंगनाला दिला आहे. दरम्यान ‘जजमेंटल है क्या’ च्या निर्मात्यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे.

‘रविवारी घडलेल्या प्रकारावरून आम्ही गिल्डमधील सर्व पत्रकारांनी कंगना रनौतवर बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे. जो पर्यंत कंगना व एकता कपूर माफी मागत नाही तोपर्यंत तिच्या कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहणार नाही’, गिल्ड संघटनेतील पत्रकारांनी सांगितले. गिल्डने एकता कपूरला पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता जजमेंटल है च्या कोणत्याही कार्यक्रमात पत्रकार जाणार नसल्याचे समजते.

रविवारी जजमेंटल है च्या एका कार्यक्रमात कंगनाचा पीटीआईचा पत्रकार जस्टीन राव याच्यासोबत वाद झाला होता. जस्टीनने कंगनाला एक प्रश्न विचारला असता कंगना त्याच्यावर भडकली व म्हणाली, ‘तु माझ्या बद्दल किती घाणेरडं लिहतोस. अत्यंत फाजील आहेस तु. एवढे घाणेरडे विचार कुठून आणतोस? त्यानंतर पत्रकार संघटनांनी कंगनावर टीका करत माफीची मागणी केली होती. मात्र कंगनाची बहिण रंगोली हिने कंगना माफी मागणार नसल्याचे सांगत त्या पत्रकाराला देशद्रोही व पैशासाठी हपापलेला म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या