भाऊसाहेब शिंदेंचा ‘रौंदळ’ मराठीसह हिंदीत

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या चित्रपटांतून घराघरात पोहोचलेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे आता ‘रौंदळ’ या धडाकेबाज ऍक्शनपटात झळकणार आहे. कुतूहल जागवणारा हा ऍक्शनपट मराठी आणि हिंदीमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे.
भूमिका फिल्म्स ऍण्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन पडोळ यांनी केले आहे. कोणताही संवाद नसलेला ‘रौंदळ’चा टिझर लक्ष वेधून घेणारा आहे. पोस्टरवर दिसलेल्या भाऊसाहेबचं रौद्र रूप टिझरमध्येही दिसते. गुंडांचा धुव्वा उडवणारा भाऊ यात दिसणार असून, तो टाळ्या-शिट्टय़ांच्या वर्षावसाठी पात्र ठरणार आहे. ‘रौंदळ’ या चित्रपटात भाऊसाहेबची जोडी कोणत्या अभिनेत्रीसोबत जमली आहे हे गुपित अद्याप उघड करण्यात आलेले नाही. याखेरीज इतर कलाकारांची नावेही गुलदस्त्यात आहेत.