
बॉलीवूड अभिनेत्री गौहर खान लवकरच आई होणार असून तिने नुकतेच याबाबत चाहत्यांना बातमी दिली होती. सध्या ती प्रेग्नेसीचा आनंद घेत असून तिने शिमरी गाऊनमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.
गौहरने नुकतीच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ही गूड न्यूज चाहत्यांना दिली होती. प्रेग्नेंसीमध्ये गोहरने स्वत:ला कामात व्यस्त ठेवले आहे.
गौहरने आपले छानसे फोटोशूट करुन घेतले आहे. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेसी ग्लो स्पष्ट दिसत आहे.
गौहरच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये गौहर गुलाबी रंगाच्या शिमरी गाऊनमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे.
या फोटोंमध्ये गौहर मिनीमल मेकअपमध्ये दिसत आहे आणि त्यामध्ये तिचा प्रेग्नेेसी ग्लो दिसत आहे.
दागिने आणि केसांबाबत बोलायचे झाले तर, गोहरने तिचे केस बांधले आहेत. त्यावर ईअरिंग्स कॅरी केले आहेत. त्याचबरोबर गौहरच्या हातावर मेहेंदीही दिसत आहे.